Sun, April 2, 2023

मुंब्र्यातील बुद्धविहार अखेर सील
मुंब्र्यातील बुद्धविहार अखेर सील
Published on : 9 February 2023, 10:18 am
कळवा, ता. ९ (बातमीदार) : मुंब्र्यातील सम्राटनगर परिसरातील बुद्धविहार अनधिकृत बांधकामामुळे अखेर सील करण्यात आला. या बुद्धविहारात अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून, काही व्यक्ती हे बुद्धविहार खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे त्याचा वापर करीत असल्याची तक्रार मुंब्रा प्रभाग समितीमध्ये करण्यात आली होती. मुंब्रा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात खातरजमा केल्यावर त्यात काही अंशी हे बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. यासंदर्भात सखोल माहिती घेऊन काही दिवसांनी हे बुद्धविहार पुन्हा सार्वजनिक उपक्रमासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर साळुंखे यांनी दिली.