पोलिसांसाठी आरोग्य विषयावर चर्चा

पोलिसांसाठी आरोग्य विषयावर चर्चा

बोर्डी, ता. १२ (बातमीदार) : दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी व्यायाम व जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची गरज आहे, असे मत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत ओसवाल यांनी व्यक्त केले. पालघर पोलिस दलाच्या विद्यमाने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी नाशिक येथील सुयश रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ चिकित्सक डॉ. हेमंत ओसवाल बोलत होते. निरामय आरोग्य या विषयावर आरोग्य शिबिर व चर्चासत्र पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. भास्कर शेलार, पोलिस अधीक्षक बाळाराम पाटील, गृह विभागाचे उपपोलिस अधीक्षक शैलेश काळे आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com