पडघा वनविभागाकडुन दोन शिकारी अटकेत

पडघा वनविभागाकडुन दोन शिकारी अटकेत

Published on

पडघा, ता. ९ (बातमीदार) : जंगली प्राण्यांची शिकार करून मांस विक्रीप्रकरणी भिवंडी तालुक्यातील पडघा वन विभागाकडून आणखी दोन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पडघा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या मोंहडुळ कुडवडपाडा येथील राखीव जंगलात वन विभागाने छापा टाकून जंगली डुकरांच्या मांसासह दोन शिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली होती. सध्या त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आली असून, पडघा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल शैलेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय पवार, दिनेश माळी, वनरक्षक अमित कुलकर्णी, एम. एन. अयानवाड कार्यालयीन कर्मचारी महेंद्र भेरे, वाहनचालक विकास उमतोल या पथकाने योग्य तपास करून ज्ञानेश्वर मारुख (रा. खानिवली) व संतोष झुगरे मोंहडुळ (कुडवडपाडा) या आणखी दोन शिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १० फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत याप्रकरणी आरोपींची संख्या चार झाली असून, या घटनेबाबत अधिक तपास पडघा वनपरिक्षेत्र कर्मचारी करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.