ठाण्यात धावत्या चारचाकीने घेतला पेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात धावत्या चारचाकीने घेतला पेट
ठाण्यात धावत्या चारचाकीने घेतला पेट

ठाण्यात धावत्या चारचाकीने घेतला पेट

sakal_logo
By

ठाणे, ता. ९ (वार्ताहर) : घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणाऱ्या एका चारचाकीने गायमुख जकात नाक्याजवळ पेट घेतला. या घटनेवेळी कारमधील पाच जण सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. गुरुवारी दोन वाजण्याच्या सुमारास गायमुख जकात नाका, घोडबंदर रोड येथून ठाण्याकडे येणाऱ्या एका चारचाकीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. या वेळी चारचाकीत अनिल लोकरे, विजय लोकरे, दिलीप बामणे, कुसुम बामणे, लता दहिंदुराव कारंडे हे पाच प्रवासी बसले होते. आगीनंतर पाचही जण सुखरूप बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलिस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान पोचले. अग्निशमन दलाने आगीवर पहाटे ३-३० वाजण्याच्या सुमारास नियंत्रण मिळवले.