नवी मुंबईतील सभागृहाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबईतील सभागृहाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Published on

जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्था, पुणे संस्थेच्या नवी मुंबई येथील देशस्थ मराठा भवनामधील भव्य नूतन सभागृह व रघुनाथ महाराज मंदिराचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता. ११) सकाळी साडेनऊ वाजता सानपाडा, सेक्टर ८, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. देशस्थ मराठा भवनामधील नूतन सभागृहाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, तसेच इतर प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र नलावडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.