मेव्हण्याने केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या

मेव्हण्याने केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या

Published on

मोखाडा. ता. ९ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यातील आसे ब्राम्हणगाव येथील महेंद्र दामू भोये (वय ३०) याची दीपक महाले याने हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. महेंद्र भोये हा बहिणीला दारू पिऊन रोज त्रास देत असे, त्यामुळे संतप्त झालेल्या दीपकचा राग अनावर झाल्याने त्याने ही हत्या केली. ब्राम्हणगाव येथील दीपकच्या बहिणीचे महेंद्र भोयेशी लग्न झाले होते. महेंद्र दररोज दारू पिऊन येत, आपल्या पत्नीला त्रास देत होता. बहिणीला होणारा त्रास दीपकला बघवत नव्हता. अखेर रागाच्या भरात दीपकने बुधवारी रात्री आपल्या बहिणीचा नवरा महेंद्र याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपकला अटक केली आहे. त्याला जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास मोखाडा पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.