बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी निविदा प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी निविदा प्रसिद्ध
बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी निविदा प्रसिद्ध

बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी निविदा प्रसिद्ध

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी तांत्रिक निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी सात किलोमीटरचा भाग समुद्राखाली असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा दरम्यानच्या कामासाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड यांच्याकडून दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. सध्या तांत्रिक मूल्यमापनानंतर आर्थिक निविदा उघडल्या जाणार आहेत. बुलेट ट्रेनचा हा बोगदा जमिनीखाली २५-४० मीटर खोल आणि १३.३ मीटर व्यासाचा असणार आहे. या बोगद्याच्या एकूण लांबीपैकी १५.४२ किलोमीटरचा भाग टनेल बोरिंग मशीनद्वारे, तर उर्वरित ४.९६ किलोमीटरचे काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीनुसार केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.