‘वासिंद शहर वाहतूक समस्या सोडवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वासिंद शहर वाहतूक समस्या सोडवा’
‘वासिंद शहर वाहतूक समस्या सोडवा’

‘वासिंद शहर वाहतूक समस्या सोडवा’

sakal_logo
By

वासिंद, ता. १२ (बातमीदार) : वासिंद शहरातील वाढती ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी येथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहर शाखेच्या वतीने पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या शहरातील व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची खरेदी व कामानिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. परिणामी येथे वेळोवेळी ट्रॅफिक समस्या निर्माण होत असते. यामुळे ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी याठिकाणी कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष अमोल बोराडे, सचिव प्रीतम दामोदरे, उपाध्यक्ष कुणाल पांडव, सहसचिव प्रशांत झनकर, वैभव बिडवी, मिलिंद तारमळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.