
उल्हासनगरात समाजमंदिराचे लोकार्पण
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्यातील सुभाष टेकडी भागात असणाऱ्या पंचशील नगरात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या विकासनिधीमधून समाजमंदिर उभारण्यात आले आहे. या समाजमंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भन्तेजींना कारची भेट दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख संदीप डोंगरे, युवा सेना अधिकारी सुशील पवार, पदाधिकारी आदिनाथ कोरडे, अनिल मराठे, राजू वाळुंज, विलास काकडे, महिला आघाडीच्या स्मिता चिकलकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीचे अरुण कांबळे, अरुण काकळीस, शशी सावंत, आर. एस. गवई, आनंद बागळे, राजू तोरणे, संविधान परिवाराचे संजय वाघमारे, महेंद्र धांडे, धम्म पहाट समिती, संघमित्रा वंदना संघाच्या महिला उपस्थित होत्या.