Mon, March 20, 2023

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पोशेरा केंद्र शाळा द्वितीय
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पोशेरा केंद्र शाळा द्वितीय
Published on : 12 February 2023, 7:46 am
मोखाडा, ता. ११ (बातमीदार) : जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) यांनी तंत्रज्ञान व खेळणी या मुख्य विषयावर आधारित ५० वे पालघर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिरगाव येथे आयोजित केले होते. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मोखाडा तालुक्यातील पोशेरा केंद्र शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला असून राज्य स्तरावर भरारी घेतली आहे. या प्रदर्शनात जंक रिसायकल स्टेशन अँड रियूज सेंटर या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक पटकावला असून पुढे राज्य स्तरावर निवड झाली आहे. याकरीता दीक्षा पाटील, साधना वाघ हे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक चंपालाल पावरा यांनी सादरीकरण केले.