बाळासाहेब भालेराव यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब भालेराव यांची निवड
बाळासाहेब भालेराव यांची निवड

बाळासाहेब भालेराव यांची निवड

sakal_logo
By

मुरबाड, ता. १२ (बातमीदार) : कोरावळे येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी पत्रकार बाळासाहेब भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.
माजी आमदार गोटीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचे चेअरमनपद बिनविरोध मिळाले, असे भालेराव यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर, मुरबाडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे, माजी नगरसेवक रवींद्र देसले, आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत, मुरबाड काँग्रेस कमिटी सदस्य संजय टोहके, शकील पठाण आदींनी भालेराव यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव संतोष मोरे, माजी चेअरमन पांडुरंग धुमाळ, माजी व्हाईस चेअरमन मंगल भांडे, श्रीपत धुमाळ, शंकर धुमाळ, हरी धुमाळ, दशरथ तरे, गुलाब धुमाळ आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र पडघणे यांनी काम पाहिले.