विद्यार्थ्यांसाठीच्या बससेवेचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठीच्या बससेवेचा शुभारंभ
विद्यार्थ्यांसाठीच्या बससेवेचा शुभारंभ

विद्यार्थ्यांसाठीच्या बससेवेचा शुभारंभ

sakal_logo
By

वसई, ता. १२ (बातमीदार) : वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल शिक्षण संकुल ते वाणगाव रेल्वे स्थानक या बससेवेचा उद्‍घाटन सोहळा वाणगाव पोलिस कार्यालयाचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कोळी यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेच्या गुरुकुल शिक्षण संकुलात मुंबई, वापी, सुरत, विरारकडून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या बससेवेचा लाभ होणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, डहाणू पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेंद्र पाटील, वाणगावचे उपसरपंच ब्रिजेश ठाकूर, ओएनजीसीचे माजी महाव्यवस्थापक उमेश राऊळ, उद्योजक नरेश कंसारा, जयदेव राऊळ, संस्थेचे संस्थापक मधुकर पाटील, विश्वस्त विकास पाटील, वित्त संचालक लुमेश देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती पाटील, डॉ. सृष्टी मौर्या, डॉ. तन्वी पाटील, प्रा. सोनालिका पाटील नामदेव चव्हाण, संजय कोरे, डॉ. सुनीता ओगले, प्राध्यापक, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
....
वसई : विद्यार्थ्यांसाठीच्या बससेवेचे उद्‌घाटन अधिकारी श्रीकांत कोळी, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.