
जिजाऊ, रमाई, सावित्रीमाई यांची संयुक्त जयंती साजरी
कल्याण, ता. १३ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था कल्याण आयोजित राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तसेच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्मरणिका प्रकाशन सोहळा तसेच अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिबिर कल्याण पश्चिम येथील अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, पालिकेच्या मुख्यलेखा परीक्षक शीला जाधव, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दिलीप भोळे, नगरसेविका रेखा जाधव, चंद्रकांत पोळ, प्रकाश मोरे, संतोष हेरोडे, कल्पना खरात यांची उपस्थिती होती. दुसऱ्या सत्रामध्ये संघटना सभासद पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर या शिबिराचे अध्यक्ष दत्ता गिरी आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून जे. एस. पाटील होते.