शिंदे-फडणवीस उद्या कल्याणमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे-फडणवीस उद्या कल्याणमध्ये
शिंदे-फडणवीस उद्या कल्याणमध्ये

शिंदे-फडणवीस उद्या कल्याणमध्ये

sakal_logo
By

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : केंद्र, राज्य सरकार आणि केडीएमसीच्या निधीमधून पालिका हद्दीत विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. या कामांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे, अशी माहिती केडीएमसी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

केंद्र, राज्य सरकार आणि केडीएमसीने सुमारे १९.७६ कोटी रुपये खर्च करून कल्याणमधील प्रबोधनकार ठाकरे सरोवराचे (शेनाळे तलाव) सुशोभीकरण केले आहे. १.७ किलोमीटरमध्ये हा तलाव वसलेला असून, नागरिकांना चालण्‍यासाठी मार्गिका, निवांत बसण्यासाठी बैठक व्यवस्था, करमणूक आणि व्यायामाची साधने नव्याने निर्माण करण्‍यात आली आहेत. विशेष म्हणजे तरंगते आणि रंगीबेरंगी म्युझिकल कारंजे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकारच्या अमृत अभियान अंतर्गत वाडेघर आणि आंबिवली परिसरात मलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहेत. केडीएमसी हद्दीत बीएसयुपी अंतर्गत बांधण्यात आलेली घरे, व्यापारी गाळे यांच्या चाव्या लाभार्थीना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी देण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री शंभूराजे देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर, राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.