स्वामी विवेकानंद शाळेत स्वास्थ्यम उपक्रमाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी विवेकानंद शाळेत स्वास्थ्यम उपक्रमाला प्रतिसाद
स्वामी विवेकानंद शाळेत स्वास्थ्यम उपक्रमाला प्रतिसाद

स्वामी विवेकानंद शाळेत स्वास्थ्यम उपक्रमाला प्रतिसाद

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १३ (बातमीदार) सकाळ समूहातर्फे आयोजित केलेल्या सामूहिक सूर्य नमस्कार उपक्रमामध्ये डोंबिवलीतील दत्तनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या पहिली ते सातवीच्या ३८५ विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारासह सामूहिक सूर्यनमस्कार घातले. शाळेतील योगाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या योग चित्र प्रदर्शनाचा याप्रसंगी सर्वांनी लाभ घेतला. शाळेची माजी विद्यार्थीनी श्रेयसी रानडे हिने चित्र प्रदर्शनाबद्दल माहिती दिली. या उपक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. योगशिक्षक एकनाथ पवार यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे शरीर स्वास्थ्यासाठी असलेले महत्त्व सांगितले. ज्येष्ठ शिक्षिका गीतांजली मुणगेकर यांनी सकाळ स्वास्थ्यम या प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती दिली. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.