Sun, April 2, 2023

आयआयटीतील विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य
आयआयटीतील विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य
Published on : 13 February 2023, 3:46 am
मुंबई, ता. १३ : आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी पवई पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुभ्रो बॅनर्जी आणि मनश्री बॅनर्जी असे आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित या दोघांची दोन वर्षांपूर्वी समलैंगिक अॅपवरून ओळख झाली होती. पुढे आरोपीकडून पीडित विद्यार्थ्यावर अंधश्रद्धेचे अघोरी प्रकार करण्यात आले. तसेच प्रसादाच्या नावाने काही तरी खाऊ घालत त्यानंतर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकीही आरोपीच्या पत्नीने दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी पवई पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला.