एच. व्ही. पाटील विद्यालयाचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एच. व्ही. पाटील विद्यालयाचा स्नेहमेळावा
एच. व्ही. पाटील विद्यालयाचा स्नेहमेळावा

एच. व्ही. पाटील विद्यालयाचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

वाडा, ता. १५ (बातमीदार) : ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही पुसल्या जात नाहीत. एच. व्ही. पी. हायस्कूल चिंचघर च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी ठाणे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र येत ३३ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाला दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. संदेश पाटील, गुणिवंत वाघ यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महेश पष्टे, मनोज पाटील, रूपाली जामगावकर, रवींद्र गायकर यांनी पुढाकार घेऊन या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र, मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी डॉ. नितीन मोकाशी, मोतीराम पाटील यांनी आपल्या मनोगतातून बालपणीच्या आठवणींना उजाला दिला. तो काळ कठीण होता रोजगाराची फारशी साधने नव्हती. त्यामुळे प्रत्येकाने हलाखीच्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या शिक्षणाची आठवण व्यक्त झाली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचे काम महेश पष्टे, मनोज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेश खिस्मतराव यांनी तर आभार प्रकाश ठाकरे यांनी मानले.