भुयारी मार्गातून प्रवास सुखकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुयारी मार्गातून प्रवास सुखकर
भुयारी मार्गातून प्रवास सुखकर

भुयारी मार्गातून प्रवास सुखकर

sakal_logo
By

वाशी, ता. १५ (बातमीदार)ः ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी एमएमआरडीएने घणसोली व सविता केमिकल येथे उड्डाण पूल, तसेच महापे येथील भुयारी मार्गाचे सहा वर्षांपूर्वी १६६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले; पण महापे येथील भुयारी मार्गात पाणी साचण्याचा प्रकार घडत असल्यामुळे अपघात झाले आहेत. त्यामुळे या भुयारी मार्गाची उंची वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरून ठाण्याच्या दिशेकडून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गासाठी महापे सर्कलजवळ होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भुयारी मार्ग (अंडरपास) बांधण्यात आला. मात्र, या भुयारी मार्गात पाणी साचण्याचे प्रकार घडत असल्याने वारंवार दुरुस्तीची वेळ येत आहे. वर्षभरापासून सिडकोकडून या ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम केले जात आहे. अखेर हा मार्ग पालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या सहा मीटर असणाऱ्या भुयारी मार्गाची उंची आता साडेपाच फूट करण्यात येणार आहे. त्यामुळे या भुयारी मार्गात पाणी साचणार नसल्याचा दावा पालिकेचे शहर अंभियता संजय देसाई यांनी केला आहे.
-------------------------------
पुन्हा नव्याने काँक्रीटीकरण
खाडीतील पाण्याच्या पातळीपेक्षा भुयारी मार्गाची जमिनीची पातळी अधिक खोल होती. त्यामुळे भुयारी मार्गात पाणी साचण्यात येत होते, पण आता भुयारी मार्गाची उंची कमी करण्यात येणार आहे. पालिकेकडून देखील नव्याने पुन्हा सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात या भुयारी मार्गात पाणी साचणार नसल्याचा विश्वास पालिकेच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.