ओंदेत घरत दाम्पत्याचा सेवापूर्ती समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओंदेत घरत दाम्पत्याचा सेवापूर्ती समारंभ
ओंदेत घरत दाम्पत्याचा सेवापूर्ती समारंभ

ओंदेत घरत दाम्पत्याचा सेवापूर्ती समारंभ

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील ओंदे येथील एस. के. कृषी पर्यटन येथे माणिक धरत व संजीवनी घरत यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता समारंभ पार पडला. याप्रसंगी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे भगवान सांबरे, भावना सांबरे, विक्रमगड पंचायत समिती शिक्षणाधिकारी बी. बी. शिनगारे, जव्हार पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर खुताडे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील, राजा जाधव, पालघर जिल्हा ग्रामसेवक संघटना कोषाध्यक्ष अनिरुद्ध पाटील, ग्रामसेवक उदय शेळके, माजी मुख्याध्यापक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक देशमुख यांच्यासह राजा जाधव, अनिरुद्ध पाटील, मधुकर खुताडे, किशोर पाटील, राखी ताई, उदय शेळके यांनीही आपल्या भाषणातून घरत कुटुंबीयांचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान कुरकुटे; तर आभार प्रदर्शन सुचित घरत यांनी केले.