बापाने केली मुलाची गळा चिरून हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापाने केली मुलाची गळा चिरून हत्या
बापाने केली मुलाची गळा चिरून हत्या

बापाने केली मुलाची गळा चिरून हत्या

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १६ (बातमीदार) : बापानेच पोटच्या मुलाची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्त्या केल्याची घटना अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरात घडली आहे. हत्त्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह नाल्यात फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बापाला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्वामीनगर परिसरात राहणाऱ्या आनंदकुमार गणेशन हा गटार आणि चेंबर साफ करायचे काम करतो. गणेशचा मुलगा आकाश हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्री करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत होता. बुधवारी (ता. १५) रोजी रात्री आनंदकुमार याने मुलगा आकाश याचा धारधार शस्त्राने गळा चिरून त्याची हत्या केली. आकाश याची हत्त्या केल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्यासाठी आनंदकुमार गणेशन जात असताना काही रहिवाश्‍यांनी त्याला पाहिले. यावेळी नागरिकांनी आरोपीता पाठलाग करुन पोलिसांच्या स्वाधीन केले. बापानेच मुलाची हत्या नेमकी का केली याचा अंबरनाथ पोलिस तपास करत आहेत.