आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द!
आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द!

आदित्य ठाकरेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रद्द!

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी असलेला माहीम-वांद्रे सायकल ट्रॅक प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. स्थानिकांच्या विरोधानंतरही सुरू झालेला तब्बल २०८ कोटींचा हा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर महापालिकेकडून रद्द करण्यात आला. या निर्णयाला महापालिकेच्या पायाभूत सुविधा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. दरम्यान, भाजप नेते आशीष शेलार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काही दिवसांपूर्वीच माहीम-वांद्रे सायकल ट्रॅक प्रकल्पाला सुरुवात झाली होती. युनिक कन्स्ट्रक्शन आणि स्पेको इन्फ्रास्ट्रक्चरला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. अवघ्या ३.६ किमीच्या पदपथ आणि सायकल ट्रॅकसाठी प्रतिकिलोमीटर ४४.६५ कोटी रुपये दराने पैसे मोजण्यात येणार होते. हा प्रकल्प अतिशय महागडा आणि खर्चिक प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा वाया जात होता. स्थानिक विरोधानंतरही या प्रकल्पाचे काम देण्यात आले होते. तसेच पर्यावरणीय धोकेही समोर आले होते. सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा तसेच सी-लिंकच्या सुरक्षेचा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला असता. या सर्व बाबी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि प्रकल्प रद्द करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती, असे भाजप नेते शेलार म्हणाले.