परिवहनच्या अर्थसंकल्पाला पालिकेचा टेकू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिवहनच्या अर्थसंकल्पाला पालिकेचा टेकू
परिवहनच्या अर्थसंकल्पाला पालिकेचा टेकू

परिवहनच्या अर्थसंकल्पाला पालिकेचा टेकू

sakal_logo
By

वाशी, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मंजूर केला. परिवहन सेवेचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी ४१६ कोटी ६३ लाख जमा व चार कोटी ५५ लाख ३० हजार रुपये खर्चासह ८ लाख ६० हजार रुपये शिल्लक रकमेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांना मंजुरीसाठी सादर केला होता.

नवी मुंबई परिवहन सेवेचा गाढा हाकण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून सन २०२३-२४ या वर्षाकरिता २७४ कोटी रुपये अनुदानापोटी परिवहनला द्यावे लागणार आहेत. परिवहन सेवेला सक्षम करण्यासाठी आयुक्तांनी वाणिज्य भूखंडातून अर्थ उत्पादनांचा मार्ग अवलंबला आहे. निर्माणाधीन प्रकल्पातून वर्षात २९५ कोटी ८२ लाख भांडवली उत्पन्न मिळेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

सन २०२३-२४ मध्ये परिवहनला २३५ बसमधून ४८ कोटी ४४ लाख रुपये उत्पन्न; तर इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून ६३ कोटी १३ लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. प्रवासी पास, दंडात्मक कारवाई, बस थांब्याची जाहिरात, पोलिस खात्यांचे अनुदान यातून २० कोटी ७६ लाख महसुली उत्पन्न त्याचप्रमाणे जाहिरात सेवेतून ५० लाख, जीसीसी बस प्रवर्तनापासून ३५ कोटी ४ लाख जेएनएनयूआरएम-२ उपक्रमांतील व्होल्वो बसच्या माध्यमातून १२ कोटी ८७ लाख ७२ हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.