बुक बॅलन्सिंगमध्‍ये ‘समता’च्या विद्यार्थिनीचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुक बॅलन्सिंगमध्‍ये ‘समता’च्या विद्यार्थिनीचे यश
बुक बॅलन्सिंगमध्‍ये ‘समता’च्या विद्यार्थिनीचे यश

बुक बॅलन्सिंगमध्‍ये ‘समता’च्या विद्यार्थिनीचे यश

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) ः बुक बॅलन्सिंग स्पर्धेत साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थिनीने यश मिळवले आहे. या शाळेत इंग्रजी प्राथमिक विभागात शिकणाऱ्या संजना प्रजापती या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीने एल वॉर्ड बुक बॅलन्सिंग स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले. ही स्पर्धा शुक्रवारी (ता. १७) होली क्रॉस हायस्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत विभागातील ४० शाळांनी सहभाग घेतला होता. डोक्यावर वही घेऊन चालणे अशा प्रकारची ही स्पर्धा घेण्यात आली होती. संजना प्रजापती या यश संपादन केलेल्या विद्यार्थिनीचे समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार व प्राचार्या अंकिता कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.