Mon, March 27, 2023

टँकर उलटल्याने चालकाचा मृत्यू
टँकर उलटल्याने चालकाचा मृत्यू
Published on : 18 February 2023, 2:51 am
मनोर, ता.१८ ः मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातीवली गावच्या हद्दीत दुधाचा रिकामा टँकर उलटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता.
दुधाची वाहतूक करणारा टँकर भरधाव वेगात गुजरातच्या दिशेने जात असताना सातीवली गावच्या हद्दीतील डायमंड हॉटेल लगतच्या वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर दुभाजक ओलांडून मुंबई वहिनीवर उलटला. अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. टँकर उलटल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँकर रस्त्यावरून हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.