Tue, March 28, 2023

न्यूझीलँडच्या परराष्ट्रमंत्र्यांना मराठी खाद्यपदार्थांची भुरळ
न्यूझीलँडच्या परराष्ट्रमंत्र्यांना मराठी खाद्यपदार्थांची भुरळ
Published on : 20 February 2023, 1:00 am
मुंबई, ता. २० ः न्यूझीलँडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री नानिया महुता यांच्यासह न्यूझीलँडच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आपल्या मुंबई दौऱ्यात खास मराठमोळ्या खाद्यपदार्थांची चव चाखली. परराष्ट्रमंत्र्यांसह न्यूझीलँडचे भारतातील उच्चायुक्त डेव्हिड पाईन, क्रिकेटपटू जेफ ॲलॉट, न्यूझीलँडचे अन्य अधिकारी तसेच टाटा समूहाच्या कंपन्यांचे अधिकारी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात गोवा पोर्तुगीजा आणि दिवा महाराष्ट्राचा या हॉटेलना भेट देऊन मराठी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. मास्टर शेफ दीपा सुहास अवचट यांच्या देखरेखीखाली या वेळी विशेष महाराष्ट्रीय व गोयंकार रेसिपीचे खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते. या वेळी पाहुण्यांनी काजू कोथिंबीर वडी, कोळंबी, रावस, चिकन, अप्पम, तांदळाची भाकरी, दुधी हलवा, खरवस आदी पदार्थ खाऊन समाधान व्यक्त केले.