दिवा शहरात शिवभक्तांचा उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवा शहरात शिवभक्तांचा उत्साह
दिवा शहरात शिवभक्तांचा उत्साह

दिवा शहरात शिवभक्तांचा उत्साह

sakal_logo
By

दिवा, ता. २० (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने दिवा शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून दिवा शहरातून छत्रपतींची मिरवणूक काढून एकात्मतेचा संदेश देण्यात आला होता. शिवजयंतीनिमित्त सकाळी शिवनेरीवरुन शिवज्योत दिव्यात आणण्यासाठी शिवभक्त शिवनेरी ते दिव्यापर्यंत धावले. त्यानंतर सर्वधर्मीय एकत्र येऊन महिला व पुरुषांची लेझीम, ढोलपथकात एकात्मतेचा संदेश देत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवरायांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करून दिवावासियांनी जोरदार स्वागत केले. प्रसंगी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासोबत नवनीत पाटील, तुषार पाटील, विजय भोईर, रोशन भगत, विनोद भगत, डॉ. सतीश केळशिकर यांच्यासह पोलिस अधिकारी व मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच सचिन भोईर यांच्या श्री समर्थ मित्र मंडळच्या वतीने दिव्यात रक्तदान शिबिर व मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिवा शहरात बाईक रॅली काढत शिवाजी महाराजांचा जयघोष करत, झेंडे फडकवत महाराजांना मानवंदना देण्यात आली. या वेळी रक्तदान शिबिराचेदेखील आयोजन करण्यात आले होते.