Fri, March 31, 2023

बँकेच्या एसी युनिटला आग
बँकेच्या एसी युनिटला आग
Published on : 21 February 2023, 4:22 am
ठाणे, ता. २१ (वार्ताहर) ः ठाण्याच्या नौपाडा परिसरातील बँक ऑफ बडोदाच्या एसी युनिटला मंगळवारी (ता. २१) सकाळी १०ः३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले.
ठाण्याच्या नौपाडा परिसरातील राम मारुती रोडवरील बँक ऑफ बडोदामध्ये एसी युनिटला आग लागली होती. घटनास्थळी नौपाडा पोलिस कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी पोहोचत त्वरित आग विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही.