दुचाकी प्रवासी वाहतुकीला परवानगी नकोच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी प्रवासी वाहतुकीला परवानगी नकोच!
दुचाकी प्रवासी वाहतुकीला परवानगी नकोच!

दुचाकी प्रवासी वाहतुकीला परवानगी नकोच!

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : राज्यात सुमारे १४ लाखांहून अधिक ऑटोरिक्षा चालक-मालक आहेत. रिक्षा व्यवसाय करून ते उपजीविका चालवतात. मुक्त परवानावाटप धोरणामुळे आणि कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा व्यवसाय तोट्यात जात आहे. त्यातच दुचाकी प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यास ऑटोरिक्षा प्रवासी वाहतूक व्यवसाय संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी सनदी अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेत आज (ता. २१) पार पडलेल्या बैठकीत दुचाकी प्रवासी वाहतुकीला परवानगी देऊ नये, असे मत ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.
विविध कारणास्तव रिक्षा चालक-मालकांचे उत्पन्न २०१७ च्या तुलनेत जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. रिक्षाचालकांना रिक्षासाठी घेतलेले कर्ज फेडणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दुचाकी प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यास रिक्षाचालकांची परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे दुचाकी प्रवासी वाहतुकीला परवानगी देऊ नये, अशी मागणी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी झा यांच्या समितीपुढे केली.