Fri, March 31, 2023

ओरिएन्ट सिमेंटचा
अदाणीसोबतचा करार रद्द
ओरिएन्ट सिमेंटचा अदाणीसोबतचा करार रद्द
Published on : 22 February 2023, 6:05 am
मुंबई, ता. २२ ः सी. के. बिर्ला समूहाचा भाग असलेल्या ओरिएन्ट सिमेंटने अदाणी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडसोबत (एपीएमएल) असलेला सामंजस्य करार रद्द करण्याची घोषणा बुधवारी (ता. २२) केली. तिरोडा येथील प्रस्तावित सिमेंट ग्राईडिंग युनिट उभारण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यात अदाणी अपयशी ठरला, असे ओरिएन्ट समूहाचे म्हणणे आहे. ओरिएन्ट सिमेंटने सप्टेंबर २०२१ मध्ये अदाणी समूहासोबत सामंजस्य कराराची घोषणा केली होती. अदाणी पॉवरने हा करार न करण्याची विनंती केली आहे, असे कंपनीने शेअर बाजाराला सांगितले.