Sun, March 26, 2023

उल्लू , युवीसह अश्लील अँपवर बंदी घाला
उल्लू , युवीसह अश्लील अँपवर बंदी घाला
Published on : 23 February 2023, 9:53 am
कल्याण, ता. २२ (बातमीदार) : उल्लू, युवीसह अनेक अश्लील अॅपने मोबाईलवर धुमाकूळ घातला आहे. ते ॲप डाऊनलोड केल्यास अनेक अश्लील चित्रपट त्यावर दिसतात. मोठ्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड आहे; पण मोबाईलवर दिसणाऱ्या अश्लील चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा ॲपमुळे शाळकरी आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्याकडे सहयोग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी केली आहे. देशात आज अनेक मोबाईल अॅपमुळे घाणेरड्या विचारांची प्रवृत्ती वाढीस लागली असल्याची खंत भोसले यांनी व्यक्त केली.