मांगुर उत्पादकांना मत्स्यविभागाचा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांगुर उत्पादकांना मत्स्यविभागाचा दणका
मांगुर उत्पादकांना मत्स्यविभागाचा दणका

मांगुर उत्पादकांना मत्स्यविभागाचा दणका

sakal_logo
By

खालापूर, ता.२३ (बातमीदार)ः तालुक्यातील बेकायदेशीर मांगुर तलावावर केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत ३५ हजार किलो मासे नष्ट करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी रायगड सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागाकडून फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत.
पाताळगंगा नदी लगत असलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात मांगुर माशांची पैदास केली जाते. नदीकिनारी असलेल्या या तलावातील पाणी गटारातील पाण्यापेक्षा घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे. सडलेले खाद्य मांगुर माशांना खायला दिले जाते. त्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरत असून तलावातील पाणी नदी पात्रात सोडली जात असल्याने पाताळगंगा प्रदूषित होत आहे. तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची योजना देखील पातळगंगा नदीवर कार्यान्वित असल्यामुळे शेकडो कुटुंबांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. त्यामुळे रायगड मत्स्य विभागाकडून मांगुर हद्दपारसाठी कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे. तसेच महड तीर्थक्षेत्री परिसर मांगुर माफीयांविरोधात सामाजिक संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत.
--------------------------
तालुक्यातील मांगुर तलावावर कारवाई सुरू आहे. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि वेळ लागत असल्याने कारवाईला वेग येत नाही. यापुढे देखील कारवाई सातत्य राहणार आहे.
-संजय पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग, रायगड
------------------------------
महड तीर्थक्षेत्राची धार्मिक भावना जोडलेली असून या ठिकाणी मांगुर तलावातील मेलेले मासे जाळत असून परिसर दुर्गंधी भरून जातो. महड परिसराचे पावित्र्य मांगुर माफीया बिघडवत असून कडक कारवाईसाठी उपोषणाची तयारी केली आहे.
-शिवलिंग वाघरे, खालापूर