तालुक्यातील कामे मार्चअखेर पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुक्यातील कामे मार्चअखेर पूर्ण करा
तालुक्यातील कामे मार्चअखेर पूर्ण करा

तालुक्यातील कामे मार्चअखेर पूर्ण करा

sakal_logo
By

कासा, ता. २५ (बातमीदार) : जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू तालुक्यातील विकासकामांचा आढावा सर्व जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विभागप्रमुख, तसेच डहाणू तालुक्यातील सर्व सरपंच यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या आढावा बैठकीत विविध विकासकामे, डहाणूतील विविध बांधकामे, आदिवासी समाजाच्या सोयीसुविधा या मार्चपर्यंत पूर्ण करा, नाहीतर संबंधित अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीद्र शिंदे यांनी सांगितले.
सायवन, तवा, एना प्राथमिक आरोग्य केंद्रात वीजजोडणी, पाणीपुरवठा केला जावा, दिव्यांगांसाठी दाखल्यांची सोय, बालविवाह, स्थलांतर, पूरक पोषण आहार, अमृत आहार, मनरेगा, शाळा दुरुस्ती या कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व वित्त समिती सभापती पंकज कोरे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, ज्योती पाटील, जयेंद्र दुबळा, लतिका बालशी, शैलेश करमोडा, देवानंद शिंगाडे, सतीश करबट, सुनील माच्छी, पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. गटविकास अधिकारी डहाणू पल्लवी सस्ते यांच्या नियोजनाखाली ही बैठक पार पडली.