Mon, March 20, 2023

सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन
Published on : 24 February 2023, 2:48 am
ठाणे, ता. २४ : शासकीय निर्णय असतानाही वेतन श्रेणीचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (ता. २४) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियमानुसार कर्मचाऱ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर १ ऑक्टोबर १९८९ रोजी बढती करण्यात आली होती. मात्र त्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळत नव्हता. १ फेब्रुवारी २००६ रोजी आश्वासित प्रगत योजनेचा दुसरा वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, तसेच वेतन श्रेणीचा फरक रोखीने देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी समितीच्यावतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.