अधिकारी भासवून दुकानदाराला लुबाडले दुकानदाराला लुबाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकारी भासवून दुकानदाराला लुबाडले
दुकानदाराला लुबाडले
अधिकारी भासवून दुकानदाराला लुबाडले दुकानदाराला लुबाडले

अधिकारी भासवून दुकानदाराला लुबाडले दुकानदाराला लुबाडले

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : अधिकारी आल्याचे भासवून भामट्याने कोपरखैरणेमधील एका किराणा दुकानदाराला धमकी देत त्याच्याकडून रोख रकमेसह मोबाईल व इतर वस्तू लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
खिरु श्रीमूर्त साहू (४५) यांचे कोपरखैरणे सेक्टर-१२डी भागात किराणा मालाचे दुकान आहे. २ फेब्रुवारीला एक भामटा नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधील अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या दुकानात गेला. त्याने दुकानात अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत सुगंधित सुपारी, सिगारेट आणि तंबाखू एका पिशवीमध्ये भरण्यास सांगून त्याला वाशीतील चौकीत येण्यास बजावले. त्यामुळे घाबरलेल्या दुकानदाराने सामान एका पिशवीत भरल्यानंतर भामट्याने त्याच्या खिशातील १२ हजारांची रोख रक्कम आणि त्याचा मोबाईल काढून घेतला.

व्यापाऱ्यालाही धमकावले
दुकानदाराला वाशीतील चौकीवर नेण्याच्या बहाणा करून भामट्याने स्कुटीवरून सामानासह वाशीतील सागर विहार परिसरात नेले. त्यानंतर त्याने खिरु साहू याला तंबाखू, सिगारेट विकणाऱ्या संतोष राय याचा मोबाईल क्रमांक घेत दुकानदार आणि त्याच्या दुकानातून जप्त केलेला माल सोडण्यासाठी २० हजार रुपये घेऊन येण्यास त्याला बजावले. मात्र, त्याने बराच वेळ झाल्यानंतर पैसे पाठवले नसल्याने दुकानदाराला त्याच ठिकाणी सोडून पलायन केले; मात्र मोबाईल व रोख रक्कम परत न केल्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.