वीज दरवाढीविरोधात मंगळवारी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज दरवाढीविरोधात मंगळवारी आंदोलन
वीज दरवाढीविरोधात मंगळवारी आंदोलन

वीज दरवाढीविरोधात मंगळवारी आंदोलन

sakal_logo
By

पालघर, ता. २५ (बातमीदार) : महावितरण कंपनीने ६७ हजार ६४४ कोटी रुपये त्रुटीच्या भरपाईसाठी ३७ टक्के म्हणजे सरासरी २.५५ रुपये प्रतियुनिट याप्रमाणे प्रचंड दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगाकडे दाखल केला आहे. ही दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून आयोगाकडे हजारोच्या संख्येने सूचना व हरकती दाखल करण्यात आल्या. यानंतर या वीज दरवाढीच्या विरोधात संपूर्ण राज्यात येत्या मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता वीज दरवाढ प्रस्ताव होळी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर पालघर येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ ही आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. त्याचबरोबर राज्यात सर्वत्र वीज ग्राहकांनी या दरवाढीविरोधी आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले आहे
आंदोलनाआधी स्थानिक आमदार, खासदार व मंत्री यांची समक्ष भेट घेऊन ही दरवाढ रद्द करावी, अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने यामध्ये पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. महावितरणचे सध्याचे दर हे देशातील सर्वाधिक दर असूनही इतकी प्रचंड दरवाढ मागणी ही राज्यातील सर्वसामान्य घरगुती व व्यवसायिक ग्राहकांना धक्का देणारी आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.