Mon, March 27, 2023

शुभदा केदारी यांचा गौरव
शुभदा केदारी यांचा गौरव
Published on : 26 February 2023, 11:22 am
प्रभादेवी, ता. २६ (बातमीदार) : समाजाला अभिप्रेत असलेले सकारात्मक काम करणाऱ्या व आपल्या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कर्तृत्ववान, धाडसी व गुणसंपन्न स्त्री म्हणून सेंट कोलंबा शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा केदारी यांचा गौरव करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आम्ही बाळासाहेबांच्या लेकी या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले; तर नुकताच पार पडलेल्या राज्यातील सामाजिक वनीकरण वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट काम करणारी संस्था म्हणून विभागस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारदेखील शुभदा यांना प्रदान करण्यात आला.