मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढणार : असदुद्दीन ओवेसी

मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढणार : असदुद्दीन ओवेसी

Published on

वाशी, ता. २५ (बातमीदार) : एमआयएम पक्षाची ताकद वाढत असून मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका या लढवण्यात येणार असल्याचे वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवी मुंबईत केले आहे. एमआयएम (ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लीमन) या पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन नवी मुंबईतील महापे येथे सुरू आहे.
शनिवारी या अधिवेशनाची सुरुवात झाली असून दोन दिवस हे अधिवेशन सुरू राहणार आहे. यावेळी अधिवेशनाला १६ राज्यांतील एमआयएमचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. यामध्ये राज्यात पक्ष अधिक संघटित करण्यावर भर देण्यात येणार आहे. एमआयएमची स्थापना झाल्यापासून राष्ट्रीय अधिवेशन पार पडले नव्हते. पक्षाचा सर्व राज्यांमध्ये विस्तार झाल्याने राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. या अधिवेशनात पक्षाचे सर्व खासदार, आमदार, प्रवक्ते, प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले आहेत. या अधिवेशनाला पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मार्गदर्शन केले. एमआयएमला विविध राज्यांमध्ये पाठिंबा मिळत आहे. आगामी लोकसभा तसेच विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची वाढ करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतील, असे जलील यांनी यावेळी सांगितले. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले आहे, पण यामध्ये स्थानिक नागरिकांचा विचार केलेला नाही. नाव बदलल्यामुळे तेथील इतिहास बदलणार नाही. या विरोधात न्यायालयात लढा सुरू असताना केंद्र सरकारने निर्णय घेणे हे चुकीचे आहे. या विरोधामध्ये कायेदशीर लढा हा सुरूच राहणार आहे. येथे हुकूमशाहीसारखे वातावरण सुरू असल्याची टीका खासदार जलील यांनी केली.
--------------
शिवसेनेतील दुफळीमुळे मराठी माणसांचे नुकसान
औरंगाबाद शहराचे नाव बदलल्यामुळे सरकारकडून तेथील असणाऱ्या शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, पाण्याची समस्या यासाठी काय निधी देणार आहात का, असा सवाल उपस्थित केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कंट्रोल हा देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांच्या हातात आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या दुफळीमुळे मराठी माणसांचे नुकसान झाले असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
--------
युतीसंदर्भात चर्चा
येत्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे येथे कोणत्या पक्षाबरोबर युती करायची यासंदर्भात एमआयएमच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लिमबहुल भाग असणाऱ्या मुंब्रा, भिंवडी आदी ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मनसे, भाजप व शिंदे गटाकडून धार्मिक विधाने करण्यात येत आहेत, त्याच्यावर कशा पद्धतीने राजकीय उत्तरे द्यायची यासंदर्भातदेखील चर्चा अधिवेशनात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com