सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा

sakal_logo
By

भिवंडी, ता.२५(बातमीदार): कर्तव्यावर असणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला एका दाम्पत्याने शिवीगाळ केल्याची घटना कोनगाव पोलिस ठाण्याच्याहद्दीतून समोर आली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद शांताराम पवार यांच्या फिर्यादीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रविण बबन हुंबे व कीर्ती प्रविण हुंबे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सपोउनि विनोद पवार हे रांजणोली बायपास नाक्यावर ऑल आऊट ऑपरेशन मोहिमे अंतर्गत गस्त करीत होते. त्यावेळी प्रविण आणि त्याची पत्नी कीर्ती हे दाम्पत्य दुचाकीवरून कल्याणहून भिवंडीच्या दिशेने जात असताना कर्तव्यावर असणाऱ्या विनोद पवार यांनी गस्तीदरम्यान त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र दाम्पत्याने आरडाओरड पवार यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने या दाम्पत्यावर कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद कडलग करीत आहेत.