पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सदस्यपदी मकरंद मुळे

पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सदस्यपदी मकरंद मुळे

ठाणे, ता. २६ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सदस्यपदी मकरंद मुळे यांची निवड झाल्यानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीचे कार्यकारी संचालक प्रा. जयंत कुलकर्णी, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, साहित्य परिषदेचे दिनेश प्रताप सिंग, प्रा. बळीराम गायकवाड यांच्या हस्ते मकरंद मुळे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवी कुमार, ठाणे जिल्हा संघचालक अरविंद जोशी, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळंकुरकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अनंत देशमुख, युवा लेखक अहमद शेख, टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, उपाध्यक्ष वीरेंद्र संघवी, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष उत्तम जोशी, टीजेएसबी बँकेचे संचालक दिलीप सुळे, समीर कांबळे, कै. वामनराव ओक रक्तपेढीचे अतुल धर्मे, जनकल्याण समितीचे प्रदीप पराडकर यासह ठाण्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com