‘स्वच्छ जल स्वच्छ मन’अंतर्गत नदीची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्वच्छ जल स्वच्छ मन’अंतर्गत नदीची स्वच्छता
‘स्वच्छ जल स्वच्छ मन’अंतर्गत नदीची स्वच्छता

‘स्वच्छ जल स्वच्छ मन’अंतर्गत नदीची स्वच्छता

sakal_logo
By

कासा, ता. २६ (बातमीदार) : स्वच्छ जल स्वच्छ मन योजनेंतर्गत संत निरंकारी संस्थेद्वारे चारोटी कासा परिसरातील नदी नाले परिसर स्वच्छ करण्यात आला. चारोटी येथील गुलजार नदी तसेच कासा येथील सूर्या नदी परिसरातील स्वच्छता मोहिमेमध्ये जवळपास ३०० संत निरंकारी स्वयंसेवक सहभागी झाले होते. संत निरंकारीचे चारोटी शाखेचे मुख्य राजेंद्र मेहेर व अनेक स्वयंसेवक यात सहभागी झाले होते.
कासा सूर्या नदीकिनारी स्वच्छता करताना कासाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील हेसुद्धा सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी सांगितले की, स्वच्छ जल स्वच्छ मन हा प्रकल्प खूप सुंदर असून यात सर्वच भारतीयांनी सहभागी झाले पाहिजे. या वेळी मोठ्या प्रमाणात नदी किनाऱ्याजवळील प्लास्टिक, कचरा बाजूस काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहीममध्ये नदी परिसर स्वच्छ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.