मराठी भाषादिनानिमित्त आज मराठीचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषादिनानिमित्त आज मराठीचा जागर
मराठी भाषादिनानिमित्त आज मराठीचा जागर

मराठी भाषादिनानिमित्त आज मराठीचा जागर

sakal_logo
By

दिवा, ता. २६ (बातमीदार) : मराठी भाषादिनानिमित्त सोमवारी (ता. २७) स्वामीराज प्रकाशन, श्रीरंग थिएटर, डोंबिवली आणि कल्याण काव्य मंचच्या सहकार्याने ‘शब्दोत्सव’ हा मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कल्याण महिला मंडळ सभागृहात हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत रंगणार आहे. सलग १० तास, ८० कलावंत मराठी साहित्यातील निवडक कथा, कविता, कादंबरी, नाटक आदींचे अभिवाचन करणार आहेत. या महोत्सवात कल्याण काव्य मंच, श्रीरंग थिएटर-डोंबिवली, कल्याण सार्वजनिक वाचनालय, अभिव्यक्ती-ठाणे, साहित्य गंध-कल्याण, चार मित्र-कल्याण, विवक्षा-कल्याण, सफल-कल्याण, नाट्य रसिकहो-कल्याण, मंच मंथन-डोंबिवली, आकांक्षा क्रिएशन-कल्याण या संस्थांचे अभिवाचक सहभाग नोंदवणार आहेत. या महोत्सवाचे उद्‍घाटन सुप्रसिद्ध मालिका दिग्दर्शक राजू सावंत यांच्या हस्ते होणार आहे. गझलकार प्रशांत वैद्य, भिकू बारस्कर, सुप्रसिद्ध रंगकर्मी सुनील देवळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.