दिवा दातीवली फाटकाजवळ डांबरीकरण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवा दातीवली फाटकाजवळ डांबरीकरण पूर्ण
दिवा दातीवली फाटकाजवळ डांबरीकरण पूर्ण

दिवा दातीवली फाटकाजवळ डांबरीकरण पूर्ण

sakal_logo
By

दिवा, ता. २६ (बातमीदार) : दातिवली रेल्वे क्रॉसिंग फाटकातील खड्डे बुजवून अखेर डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्‍यात आले. या फाटकात काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या कामानिमित्त खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांना फाटकातून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्या फाटकातून जाताना दुचाकी, चारचाकी गाडीही अडकून पडत होती. या वेळी अन्य नागरिकांच्‍या मदतीने वाहनाला धक्का मारूनच फाटकातून बाहेर काढावे लागत होते. रोजचा होणारा हा मनस्ताप काही वाहनचालक व ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला उपशहरप्रमुख योगीता नाईक यांच्या कानी घातला. या समस्येचे निवारण करण्यासाठी नाईक यांनी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ३० जानेवारी रोजी मंडळ रेल प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना पक्षाच्या वतीने निवेदन दिले. तसेच लवकरात लवकर दातिवली रेल्वे फाटक येथे डांबरीकरण करण्याची विनंती केली. त्यानुसार १० ते १५ दिवसांत डांबरीकरण करू, असे आश्‍‍वासन देण्‍यात आले. त्यानंतर पुन्हा डांबरीकरणासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्याची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत दातिवली येथे डांबरीकरण पूर्ण केले. त्याबद्दल मंडल रेल्‍वे प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपशहरप्रमुख योगीता नाईक यांनी आभार मानले.