Wed, March 29, 2023

ओकायाची ‘फास्ट एफ२एफ’ स्कूटर लाँच
ओकायाची ‘फास्ट एफ२एफ’ स्कूटर लाँच
Published on : 26 February 2023, 12:46 pm
मुंबई, ता. २६ : ओकाया ईव्ही या भारतातील इलेक्ट्रिक वाहन कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘फास्ट एफ२एफ’ सादर केली आहे. ही स्कूटर सिंगल चार्जवर ७०-८० किलोमीटर आणि ताशी ५५ किलोमीटरचा वेग पकडू शकते. या स्कूटरमध्ये २.२ केव्ही लिथियम आयन एलएफपी बॅटरी देण्यात आली आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत ८३,९९९ असून, मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सायन, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाइट अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध असेल. परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे वळणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय म्हणून उदयास येईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे ओकाया इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अंशुल गुप्ता यांनी सांगितले.