Sat, March 25, 2023

‘एबीबी इंडिया’ची नाशिकमध्ये आधुनिक फॅक्टरी
‘एबीबी इंडिया’ची नाशिकमध्ये आधुनिक फॅक्टरी
Published on : 26 February 2023, 12:44 pm
नाशिक, ता. २६ : ‘एबीबी इंडिया’ने नाशिकमध्ये त्यांच्या नवीन अत्याधुनिक फॅक्टरीचे उद्घाटन करत स्वत:ची गॅस इन्सुलेटेड स्विचगिअर (जीआयएस) उत्पादन क्षमता दुप्पट केली. या फॅक्टरीमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी जीआयएस उत्पादित केले जाणार आहेत. ही उत्पादने वीज वितरण, स्मार्ट शहरे, डेटा सेंटर्स, परिहवन (मेट्रो, रेल्वे), बोगदे, बंदर, महामार्ग आणि इतर पायाभूत विकास सुविधा यांसारख्या विविध उद्योगांमधील ग्राहकांना सेवा देईल. एबीबीच्या सस्टेनेबिलिटी स्ट्रॅटेजी २०३०च्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने ७८ हजार चौरस फूट क्षेत्रात विस्तार असलेल्या या फॅक्टरीमध्ये प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर केला असून रोबोटिक्सच्या साह्याने उत्पादन क्षमता आणि गुणवत्तेमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.