अजनुप शाळेच्या विद्यार्थ्यांचे खोखो स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजनुप शाळेच्या विद्यार्थ्यांचे खोखो स्पर्धेत यश
अजनुप शाळेच्या विद्यार्थ्यांचे खोखो स्पर्धेत यश

अजनुप शाळेच्या विद्यार्थ्यांचे खोखो स्पर्धेत यश

sakal_logo
By

शहापूर, ता. २७ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शहापूर तालुक्यातील अजनुप जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी खो-खो स्पर्धेत बाजी मारली आहे. भिवंडी तालुक्यातील भवाली येथील ऑल सेंट हायस्कूल येथे पार पडलेल्या या खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अजनुप शाळा सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाची मानकरी ठरली आहे. या यशामध्ये विस्तार अधिकारी क्रीडा विभागाच्या प्राजक्ता राऊत, गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच मार्गदर्शक महादू मेंगाळ, विशेष सहकार्य रामचंद्र वायाळ, विश्वास पाटील व प्रशांत तुपे, अजनुप शाळेतील शिक्षक भरत कोदे, शरद जाधव, दिगंबर पवार, शोभा महाजन, अस्मिता तारमळे आणि सुलोचना डगळे, तसेच जयवंत शेलवले आणि मोरेश्वर उमवणे यांच्यासह व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ आणि पालक यांचे सहकार्य लाभले.