कथा अभिवाचन स्पर्धेत अंबर्जे शाळेचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथा अभिवाचन स्पर्धेत अंबर्जे शाळेचे यश
कथा अभिवाचन स्पर्धेत अंबर्जे शाळेचे यश

कथा अभिवाचन स्पर्धेत अंबर्जे शाळेचे यश

sakal_logo
By

खर्डी, ता. २७ (बातमीदार) : मराठी भाषा दिन पंधरवड्यानिमित्ताने ‘पारिजात मुंबई’च्या वतीने आयोजित केलेल्या कथा अभिवाचन स्पर्धेचे आयोजन दादर येथील कीर्ती महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई विभागातून २४ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ग्रामीण भागातील अंबर्जे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विशाखा सुतार, मिथिल परटोले, पूर्वा सुतार व मनीष डोंगरे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ज. तु. गार्डे लिखित ‘एका भुताची गोष्ट’ या कथेला चतुर्थ, तसेच वेदिका गोंधळी, हर्षला माळी, चिन्मय कडव व समीक्षा डोंगरे यांनी सादर केलेल्या रा. रं. बोराडे लिखित ‘लाखमोलाची शिकवण’ या कथेला पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे, शेरे केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कळसकर व मुख्याध्यापक महादू कनकोसे यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.