Mon, March 27, 2023

दह्याळे शाळेत भाषा गौरवदिन साजरा
दह्याळे शाळेत भाषा गौरवदिन साजरा
Published on : 27 February 2023, 11:00 am
कासा, ता. २७ (बातमीदार) : कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त सोमवारी (ता. २७) दह्याळे शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या वेळी मुलांची प्रभातफेरी काढून मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्यात आले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता भावर, मेघलता सावंत, राजेश भोईर, संतोष तळेकर, यशोदीप धनराळे, सेवक रूढे आदी शिक्षक उपस्थित होते.