Tue, March 21, 2023

मराठीत बोलूया, विचार मांडूया : फा. फ्रान्सिस दिब्रिटो
मराठीत बोलूया, विचार मांडूया : फा. फ्रान्सिस दिब्रिटो
Published on : 27 February 2023, 11:55 am
वसई, ता. २७ (बातमीदार) : आधुनिकीकरण व जागतिकीकरणामुळे जे स्थानिक आहेत त्याच्यावर वरवंटा येऊ पाहत आहे. हीच बाब भाषेला लागू होत आहे. स्थानिक भाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कुसुमाग्रजांनी हे लक्षात आणून दिले. त्यामुळे मराठीमध्ये बोलूया आणि मराठीमध्ये विचार करूया, असे आवाहन जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मत व्यक्त केले. मराठीबद्दल असलेले प्रेम व्यक्त करताना मराठी बोलीभाषा जपण्याचे आवाहन या वेळी त्यांनी तरुणांना केले.