Sun, April 2, 2023

ऑर्किड्स स्कूलमध्ये मराठी भाषा दिवस
ऑर्किड्स स्कूलमध्ये मराठी भाषा दिवस
Published on : 28 February 2023, 12:00 pm
मुंबई, ता. २८ ः ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या महाराष्ट्रातील सर्व शाखांमधील (मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर) विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत ‘मराठी भाषा दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांनी परंपरागत महाराष्ट्रीय वेशभूषा केली होती. राज्यातील थोर पुरुष, समाजसुधारक, संत आदींच्या वेशभूषेतील मुलांनी या महात्म्यांचे समाजकार्य कथन केले. त्याखेरीज कवितावाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन आदी उपक्रमही यानिमित्ताने आयोजित केले होते. देशाच्या व राज्याच्या सांस्कृतिक परंपरांचा शाळेतर्फे नेहमीच आदर केला जातो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी भाषेचा आदर करतील, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.