Tue, March 28, 2023

म अक्षरापासून कुसुमाग्राजांची प्रतिमा
म अक्षरापासून कुसुमाग्राजांची प्रतिमा
Published on : 28 February 2023, 11:26 am
भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्ताने शहरातील बी. एन. एन. महाविद्यालयात वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. अशोक वाघ आणि उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटणकर-जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयात विविध विषयप्रमुख, सहयोगी प्राध्यापक, ज्युनियर कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी डॉ. राजेंद्र डोंगरदिवे, मराठी विभागातील डॉ. अलका कदम आदी उपस्थित होते. शहरातील जेएईचे पूर्वप्राथमिक व प्राथमिक शाळेच्या आवारात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळेच्या आवारात मराठी संस्कृतीच्या पेहरावात ग्रंथदिंडी काढून मराठी भाषेचा गजर केला. तसेच अंजूरफाटा येथील हालारी विशा स्कूलमधील प्राथमिक शाळेच्या मुलांनी म म असे अक्षर लिहून कुसुमाग्रजांची प्रतिमा बनविली.